पिंपरी, (प्रतिनिधी) – ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा समाजाला खूप उपयोग होतो. त्यामुळे ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय नेतेमंडळी प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार अण्णा बनसोडे यांनी दिले.
चिंचवड येथे आनंद ज्येष्ठ नागरिक संघाने आयोजित केलेल्या कार्य्रमात ते बोलत होते. या वेळी विधानपरिषद आमदार उमा खापरे, माजी नगरसेवक शीतल शिंदे, राजाभाऊ गोलांडे, ॲड. संदीप चिंचवडे, अजित गव्हाणे, सचिन वाल्हेकर, विक्रांत लांडे, शैला मोळक, आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर, कार्याध्यक्ष प्रिया जोशी, उपाध्यक्ष अशोक नागणे, सचिव रवींद्र कुलकर्णी, खजिनदार रवींद्र झेंडे, कार्यकारिणी सदस्य शशांक देशपांडे आदी उपस्थित होते. या वेळी विरंगुळा केंद्राच्या नूतन वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. दीपप्रज्वलन आणि श्रीराम, गणपती यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
ज्ञानेश्वर खेडकर यांनी प्रास्ताविक केले. नृसिंह पाडुळकर, शशिकांत पानट, श्रीकांत कुलकर्णी, ज्ञानोबा कुसळ, प्रदीप वळसंगकर, शाम ब्रह्मे, सुनंदा माटे, कविता कोल्हापुरे, मधुरा गाडगीळ, अश्विनी कोटस्थाने, अशोक कपोले यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रिया जोशी यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र कुलकर्णी यांनी आभार मानले.