खालापूर, (वार्ताहर) – खालापूर तालुक्यातील होनाड येथील एएके कमानी कारखान्यातील कामगारांची १०५०० वेतन वाढ झाली असून कंपनी व्यवस्थापन आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघ यांच्यात करार झाला. तर, भरघोस पगारवाढ झाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
महाराष्ट्र जनरल कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत पिंगळे १२ वर्षापासून प्रतिनिधीत्व करत असून हनुमंत पिंगळे यांनी कामगारांच्या व्यथा वेळोवेळी कंपनी व्यवस्थापनाकडे मांडल्या आहेत. परिणामी कारखान्यातील २४५ कामगारांची भरघोस १०५०० रुपयांची पगार वाढ झाली आहे.
या वेळी महाराष्ट्र जनरल कामगार संघ संस्थापक अध्यक्ष हनुमंत पिंगळे, एएके कमानी कंपनीचे मालक धीरज तलरेजा, व्यवस्थापक सौम्या मोडोल, अमोल देवकर, महाराष्ट्र जनरल कामगार संघाचे सचिव सुरज दुधावडे, कामगार प्रतिनिधी सीताराम सावंत, नागराज गौडा, अतिश वाघमारे, ज्ञानेश्वर करनुक, नितीन वाघमारे, श्रीकांत देशमुख, जगदीश खोपडे, भावेश कडू, प्रसोल केमिकलचे कामगार प्रतिनिधी प्रवीणजुनधरे, रमेश शिंदे, चंद्रकांत विचारे, निवृत्ती हडप आदी प्रमुखासह मोठ्या संख्येने कामगार वर्ग उपस्थित होता.
हनुमंत पिंगळे म्हणाले की, हा कामगारांचा विजय आहे, ही पगार वाढ करताना काही लोकांनी विघ्न घालण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा कट हाणून पडला. जाणून बुजून कोणत्याही कामगारांना टार्गेट करायच नाही. कामगार हा रिलायन्सचा कामगार झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच कामगारांनी आपल्या कामात हलगर्जीपण करू नये.
सर्व कामगारांनी सफ्टीची साधने वापरून काम करावे. त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहाल. तुम्ही माझ्या परिवारातील सदस्य आहात, त्यामुळे तुमचा मी आदर करतो. तसेच कामगार नेते हनुमंत पिंगळे यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने भरघोस पगार वाढ करता आली आहे. – धीरज तलरेजा, मालक, एएके कमानी कंपनी.