नवी दिल्ली – अयोध्येतील राम मंदिर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश विशेष कृती दलाचे प्रमुख अर्थात एसटीएफचे प्रमुख अमिताभ यश यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. एका ई- मेलवरून ही धमकी देण्यात आली आहे.
धमकी देणाऱ्याने तो इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे म्हटले आहे. त्याने भारतीय किसान मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र तिवारी यांनाही मेल पाठवला असून त्यात ही धमकी देण्यात आली आहे. लखनौच्या गोल्फ सिटी स्टेशनमध्ये यासंदर्भात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. २७ डिसेंबर रोजी दुपारी मेल पाठवण्यात आला असून त्यात अत्यंत आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आला आहे. मेल पाठवणाऱ्याने स्वत:चे नाव जुबेर हसन असल्याचे म्हटले आहे.
काय आहे पूर्ण प्रकरण
आलमबागचे रहिवासी भारतीय किसान मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र तिवारी यांना 27 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7.37 वाजता पाठवलेल्या मेलमध्ये श्री राम मंदिर आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.तसेच एसटीएफ प्रमुख अमिताभ यश आणि देवेंद्र यांना जीवे मारण्याची धमकी दिली. देवेंद्र तिवारी यांनी सांगितले की, झुबेर खान नावाच्या व्यक्तीने त्यांना धमकीचा ईमेल पाठवला आहे. झुबेरने आयएसआय संघटनेशी संबंधित असल्याचा दावा केला आहे.
अशात काही अज्ञात व्यक्तीने डायल 112 वर कॉल करून श्री राम मंदिर आणि मुख्यमंत्र्यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. याबाबत डीसीपी पूर्व यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीजीपी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार म्हणाले की, धमकीची बाब निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.