दोघांवर हल्ला करणारा बिबट्या हिवरे बद्रुकमध्ये जेरबंद

Madhuvan

ओझर-हिवरे बुद्रुक (ता. जुन्नर) येथे शुक्रवारी (दि. 25) पहाटे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली. हा बिबट्या पूर्ण वाढ झालेला असून अंदाजे 9 ते 10 वर्षे वयाचा नर आहे. त्यावर उपचार करण्यासाठी त्याला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्र येथे हलवण्यात आले आहे.

हिवरे बुद्रुक येथील पाटआळी रस्त्यावर बस्ती शिवारात गेली 15 ते 20 दिवस दोन मोठे बिबटे फिरत असल्याचे आढळून येत होते. त्याने गत दिवसात एका महिलेवर व दुचाकीस्वारावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. फक्त दैव बलवत्तर म्हणून हे ग्रामस्थ हल्ल्यातून बचावले होते. शेतात काम करण्यास कामगार मिळत नसल्याने व हातातोंडाशी आलेला घास बिबट्याच्या दहशतीमुळे वाया जाऊ नये म्हणून येथील शेतकऱ्यांनी बिबट्याच्या वावराबाबत वनविभागास कळवले.

त्यानुसार उपवनसंरक्षक जयरामे गौडा, वनपरिक्षेत्र अधिकारी अजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मनीषा काळे, सुधीर भुजबळ व आदर्श जगताप यांनी परिसरात पाहणी करत बिबट्यांच्या पंजाचा ठशांचा माग घेत एकनाथ अर्जुन भोर यांच्या शेतात पिंजरा लावला. त्यात शुक्रवारी पहाटे चारच्या दरम्यान भक्ष्याच्या शोधात हा बिबट्या जेरबंद झाला. जेरबंद झालेल्या बिबट्यास वनविभागाचे कर्मचारी वनपाल मनीषा काळे, सुधीर भुजबळ, आदर्श जगताप, ग्रामस्थ रवींद्र बेनके, ऋषभ भोर, साईनाथ भोर, माऊली हांडे, छगन भोर, नवनाथ भोर यांच्या सहकार्याने माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलवण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.