मोदी आणि गोडसेंची विचारधारा एकच – राहुल गांधी

वायनाड : नरेंद्र मोदी आणि  नाथूराम गोडसे यांची विचारधारा एकच आहे. यांच्या विचारसरणीत काहीच फरक नाही. मी गोडसेंच्या विचारांचा आहे, असं सांगण्याची मोदींमध्ये हिम्मत नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

ते आज केरळच्या वायनाडमध्ये नागरिकत्व कायदा(का) विरोधी निघालेल्या संविधान बचाव रॅलीत बोलत होते. या रॅलीला काँग्रेसचे वरिष्ठ नेते देखील उपस्थित होते. मोदी भारतीयांना भारतीयत्व सिद्ध करायला लावता आहेत. ज्यांना जो धर्म आवडतो त्यांनी तो पाळावा हे गांधीजींचे तत्व मोदींच्या लक्षात येत नाही.

कोण भारतीय आहे आणि कोण नाही हे ठरवणारे नरेंद मोदी कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माझे भारतीयत्व सिद्ध करण्याचा अधिकार मोदींना कोणी दिला? मी एक भारतीय असून मला ते सिद्ध करण्याची गरज नाही, असा टोला राहुल गांधींनी मोदींना लगावला.

पुढे बोलताना राहुल म्हणाले, बेरोजगारीबद्दल मोदींना जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा ते विषय टाळतात. सीएए आणि एनआरसी कायदे करून नोकऱ्या मिळत नाहीत. काश्मीरची सध्यस्तीथी आणि आसामध्ये उदभवलेल्या परिस्थितीबद्द मोदी युवकांची चर्चा करीत नाही असे राहुल गांधी म्हणाले.

 

 

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.