लंडन – 1960 च्या दशकातील प्रख्यात गायक आणि अभिनेता एलवीस प्रेसले यांच्या गळ्यामध्ये नेहमी असणाऱ्या एका लॉकेटचा लवकरच लिलाव होणार असून या लॉकेटला तब्बल दहा लाख डॉलर्सपेक्षा जास्त किंमत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
एल्विस प्रेसलेच्या गळ्यातील हे लॉकेट लायन क्लॉ नावाने प्रसिद्ध होते. रंगमंचावर सादरीकरण करत असताना किंवा खाजगी आयुष्यात वावरतानाही एलविसच्या गळ्यात हे लॉकेट नेहमी दिसत असे.पुढील महिन्यांमध्ये त्याच्या अनेक दागिन्यांचा लिलाव करण्यात येणार आहे.
त्यामध्ये हे प्रख्यात लॉकेटही आहे. किंग ऑफ रॉक अँड रोल म्हणून परिचय असलेल्या एल्विसची ओळखही या जगावेगल्या लॉकेटने निर्माण झाली होती. सोन्याच्या या आकर्षक लॉकेटमध्ये डायमंड आणि रुबीज हे महागडे खडेही असल्याचे दिसून येते.
या लॉकेटच्या लिलावाच्या कॅटलॉगमध्ये आरंभीची किंमत जरी साडेतीन लाख डॉलर्स दाखवण्यात आली असली तरी प्रत्यक्ष लिलावाच्या दिवशी आकडा दहा लाख डॉलर्सवर जाईल असे तज्ञांचे म्हणणे आहे.