पुणे – दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोचे उदघाटन होताच शिवाजीनगर न्यायालयातील 30 ते 40 वकिलांनी मेट्रोच्या सफरचा अनुभव घेतला. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड येथील शेवटच्या स्टॉप असा 22 मिनिटाची ही सफर अनुभवली. त्यानंतर तेथून परत सिव्हिल कोर्ट असा प्रवास केला. यामध्ये तरूणांचा सहभाग अधिक दिसून आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (मंगळवार, दि. 1) पुण्यात होते. त्यांच्या उपस्थितीत दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोचे उदघाटन झाले. त्यानंतर मेट्रो सर्वांसाठी खुली झाली. या पार्श्वभूमीवर वकिलांनी ही मेट्रोची सफर अनुभवली.