पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – व्यंकटेश बिल्डकॉनतर्फे दि. ६ व ७ एप्रिल रोजी त्यांचा नवीन प्रकल्प “व्यंकटेश लॉरेल’चा उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला. हा प्रकल्प “व्यंकटेश बिल्डकॉन’च्या विश्वास आणि वर्षानुवर्षांच्या परंपरेचेच प्रतीक आहे. सन २००० पासून, व्यंकटेश बिल्डकॉनने ग्राहकांची असंख्य गृहस्वप्ने साकारली आहेत.
“व्यंकटेश लॉरेल’ प्रकल्प सेंट्रल शिवाजीनगरमध्ये प्राइड हॉटेलजवळ स्थित असून शिवाजीनगर मेट्रो स्टेशनपासून अगदी एका मिनिटावर आहे. १.५ एकरांत वसलेल्या या ३ व ४ बीएचके आलिशान अपार्टमेंट्सच्या प्रकल्पात २० पेक्षा जास्त अत्याधुनिक सुखसुविधा आहेत.
शहराच्या मध्यभागात असल्याने महत्त्वाच्या ठिकाणांपासून उत्तम कनेक्टिव्हीटीचे सुख इथे अनुभवता येते. सर्वोत्तम लक्झरी देऊ करणाऱ्या या अपार्टमेंट्समध्ये संपन्न जीवनशैलीसाठी मुबलक जागा आहे.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये उत्कर्ष गुप्ता (झोनल हेड, आयसीआयसीआय बँक), अरविंद मोकाशी (सी. जी. एम., एसबीआय – निवृत्त), सतीश मगर (क्रेडाई इंडियाचे माजी अध्यक्ष आणि मगरपट्टा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक), कुमार गोसावी, उमेश पाटील, अंकुश आसबे (व्यंकटेश बिल्डकॉनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक), एस. आर. कुलकर्णी (एम. बी. व्ही. ए.चे संस्थापक अध्यक्ष), किशोरराजे निंबाळकर (एमपीएससीचे माजी अध्यक्ष) आणि लहुराज आसबे (व्यंकटेश बिल्डकॉनचे कार्यकारी संचालक) यावेळी उपस्थित होते.