मनाला आणि शरीराला एकाच वेळी व्यायाम घडवणारा हास्ययोगा

हास्ययोग साधना ही फक्‍त ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, अशी एक सर्वसामान्य समजूत होती. मात्र प्रत्यक्षात हास्ययोग साधना ही केवळ ज्येष्ठांसाठीच नाही, तर मुले, तरुण, प्रौढ आणि ज्येष्ठ या सर्वांसाठीच आहे, हे सर्वमान्य झालेले आहे. आता तर काही शाळांमधूनही हास्यसंघांची स्थापना करण्यास सुरुवात झालेली आहे. मनाला आणि शरीराला एकाच वेळी व्यायाम घडवणारा म्हणून हास्ययोगाकडे पाहिले जाते.

हार्दिक हास्याचे व फफ हास्याचे विशेष फायदे

हार्दिक हास्यामध्ये छातीचा पिंजरा उभ्या रेषेत लांबवला जातो, तर फफ हास्यामध्ये तो आडव्या रेषेत अधिकाधिक रुंदावला जातो. हे दोन्ही प्रकार पाठोपाठ केल्याने फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात. वायुकोषातील शिळी हवा बाहेर टाकली जाऊन फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवणे हा या हास्य प्रकारांचा विशेष फायदा आहे.

तसेच हार्दिक व फफ हास्यात मिळून 6 वेळा (कारण प्रत्येक हास्य तीनवेळा केले जाते.) प्रथम पुढे झुकून व नंतर वर येत मागे झुकून पाठीला प्रथम सुलटा व नंतर सुलटा बाक दिला जातो. यामुळ्व मेरुदंडाला (पाठीच्या कण्याला) तीव्र असा ताण दिला जाऊन त्याची लवचिकता आणि कार्यक्षमता वाढते. त्त्याचप्रमाणे मज्जासंस्थादेखील सुदृड व कार्यक्षम होण्यास मदत होते.

या दोन्ही हास्यप्रकारांत मिळून हात उंचावणे व दोन्ही बाजूंस पसरवणे, पाठीला बांक देणेम कमरेतून मागेपुढे झुकणे, कमरेला पीळ देणे, छाती रुंदावणे व लांबवणे इत्यादी स्नायूंची व सांध्यांची लवचिकता वाढवणाऱ्या अनेक हालचाली केल्या जातात. परिणामी पाठदुखी, संधिवात, सायटिका आदी व्याधी दूर होतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.