मुंबई – अभिनेता वरुण धवनला त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन कसे साधायचे हे चांगलेच ठाऊक आहे. कामात व्यस्त असूनही तो कुटुंबाचा वेळ काढतो.
पत्नी नताशा दलालसोबत चांगला वेळ घालवण्यासाठी वरून अनेकदा सुट्टीवर जाताना दिसतो. दरम्यान, नुकताच वरुण पत्नीसोबत एका रेस्टॉरंटमध्ये डिनर डेट एन्जॉय करण्यासाठी गेला होता, या दोघांचे फोटो मीडिया व्हायरल झाले आहेत. फोटोमध्ये वरुण धवन रेस्टॉरंटच्या बाहेर नताशाचा हात धरताना दिसत आहे. दोघांमध्ये जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
या जोडप्याच्या लुकबद्दल बोलायचे तर, यावेळी नताशा दलाल ब्लॅक क्रॉप टॉप आणि जॅकेटमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे, ट्राउझर्ससह कॅरी केले आहे. तिने बेज हील्स आणि काळ्या हँडबॅगसह या लुकला पूरक केले आहे
दुसरीकडे, वरूण धवन लाल स्लीव्हलेस नायके स्पोर्ट्स टी-शर्टमध्ये स्टायलिश दिसतोय, जो त्याने काळ्या कार्गो जॉगर ट्राउझर्ससह कॅरी केला आहे. वरुण-नताशाची एकत्र केमिस्ट्री नजरेसमोर येत आहे. वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, वरुण धवन शेवटचा नितेश तिवारी दिग्दर्शित बवालमध्ये दिसला होता, जो अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला होता. आता तो लवकरच सिटाडेल या मालिकेत सामंथा रुथ प्रभूसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.