नवी दिल्ली – म्यानमारमधील जेड खाणीतील भूस्खलनात ५० मजुरांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी ६.३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या ढिगाऱ्याखाली जवळपास २०० जण दबल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. यासंबंधी अग्निशामक दलाने फेसबुकवरून माहिती दिली आहे.
🇲🇲 #BREAKING【Death toll rises to 96 in monsoon landslide in #Myanmar's northernmost state】
🇲🇲 #突发【#缅甸 帕敢翡翠矿区发生大规模塌方已致约200人被吞没 遇难人数上升到96人】By 王建兵 吴歌 pic.twitter.com/xOlXuQ0KlS
— CCTV Asia Pacific (@CCTVAsiaPacific) July 2, 2020
माहितीनुसार, काचिन राज्यातील खाणीत जेड दगड गोळा करण्याचे काम चालू होते. यावेळी झालेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले आणि त्यामध्ये मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अग्निशामक दल घटनास्थळी पोहचले असून आतापर्यंत ५० मजुरांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर या ढिगाऱ्याखाली जवळपास २०० जण दबल्याची भीती वर्तवण्यात येत असून त्यांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.