मानहानी खटल्यात राहुल गांधींना जामीन

पाटणा : मोदी आडनावाला लक्ष्य केल्यावरून बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी कॉंग्रेस ‘अध्यक्ष राहुल गांधी’ यांना कोर्टात खेचले होते. सुशील यांनी स्थानिक न्यायालयात राहुल यांच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. मात्र, राहुल गांधींना आज सिव्हिल कोर्टाने याप्रकरणा बद्दल जामीन मंजूर केला आहे.

काय आहे प्रकरण-

राहुल गांधींनी काही महिन्यांपूर्वी आपल्या सभेत भ्रष्टाचाराच्या मुद्‌द्‌यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यावेळी त्यांनी सगळ्या ‘चोरांचे आडनाव मोदी कसे, असा सवाल केला होता’. मात्र, राहुल गांधींचे हे वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांना रुचले न्हवते.

राहुल गांधींच्या या वक्तव्याने मी दुखावलो गेलो आहे. त्या वक्तव्याने मोदी आडनाव असणाऱ्यांची प्रतिमा मलिन झाली आहे, असे सुशील यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हंटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.