वाघोली – वाघोली येथील शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संजय सातव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून संजय सातव पाटील मित्र परिवाराच्या वतीने एक लाख रुपयांचा धनादेश राव लक्ष्मी फाउंडेशन ला देऊन पूरग्रस्तांच्या बद्दल सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली आहे.
शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या कडे पुरग्रस्तांना मदत निधी म्हणून राव लक्ष्मी फाउंडेशन ला एक लाख रुपयाचा धनादेश संजय सातव पाटील मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आला.
याप्रसंगी माजी नगरसेवक विकास दांगट पाटील, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य रामकृष्ण सातव पाटील, पुणे जिल्हा युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप सातव पाटील, हवेली तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अनिल सातव पाटील, नटराज सातव पाटील, राहुल सातव पाटील, बाळासाहेब सातव पाटील, बाळासाहेब शिंदे, किसन जाधव, अशोक काळे, गणेश सातव, संदीप थोरात, बाळासाहेब सातव सर, युवराज दळवी, राजेंद्र पायगुडे, दशरथ भाडळे, विठ्ठल शिवरकर,नंदकुमार दरेकर,मोहन सातव, दत्तात्रय बेंडावले आदी मान्यवर उपस्थित होते.