हॉलीवूड, बॉलीवूड, टॉलीवूड आदी सर्वच मनोरंजनक्षेत्रातील कलाकार हे स्वतःच्या सौंदर्याबाबत अत्यंत दक्ष असतात. कारण सौंदर्य हा त्यांच्या प्रोफेशनचा महत्त्वाचा घटक असतो. खास करून नायिका तर सुंदर दिसण्यासाठी किती सायास करतात हे न सांगितलेलेच बरे! दिवसातून दोन वेळा- तीन वेळा आंघोळ करणाऱ्या नायिका आज बॉलीवूडमध्ये आहेत.
अशा वेळी एखाद्या नायिकेने “मला यापूर्वी कधी आंघोळ केली होती हे आठवत नाही’ असे सांगितले तर….? तुम्ही म्हणाल, “शी..शी..शी.. घाणेरडी वगैरे…वगैरे’! पण वाचकहो ही नायिका हॉलीवूडची आहे.
आता तुम्ही म्हणाल की, “परदेशातील लोकं नुसतीच गोरी असतात, स्वच्छ राहात नाहीत वगैरे…’ पण जरा थांबा.. हे विधान केलं आहे हॉलीवूडची नायिका लेडी गागा हिने आणि तेही गमतीने ! अलीकडेच तिने ट्विटरवर आपल्या पर्सनल असिस्टंटसोबत झालेले संभाषण शेअर केले आहे. या संभाषणामध्ये तिने हे विधान केले आहे. वास्तविक, शरीराच्या स्वच्छतेबाबतचे हे संभाषण आहे. पण त्यांच्या असिस्टंटने विचारले की, मॅडम तुम्ही शेवटच्या कधी न्हायला होतात?’ यावर गागाने उत्तर दिले “मला आठवत नाही’…!