वरुण बडोला हा अष्टपैलू कलाकार म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर त्याच्यात अन्यही अनेक कौशल्ये आहेत. कॉश्चुम कोऑर्डिनेटर ते असिस्टंट डायरेक्टर आणि त्यानंतर आघाडीचा अभिनेता अशी वरुणची मनोरंजन विश्वातील कारकीर्द शानदार राहिली आहे. सध्या वरुण “मेरे डॅड की दुल्हन’ या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत आहे.
यादरम्यान वरुणने आपल्यात लपलेल्या एका सुप्तगुणाचे दर्शन घडवले आहे. वरुणने या मालिकेतील काही भागांचे दिग्दर्शनही केले आहे. त्याचे झाले असे, या मालिकेचे दिग्दर्शक चार दिवसांसाठी सुट्टीवर गेले होते. त्या काळात दिग्दर्शनाची जबाबदारी वरुणने सांभाळली.
वरुण सांगतो की , या मालिकेसाठी मी नेहमीच काही ना काही इनपुटस् देत असतो. मध्यंतरी, मालिकेचे दिग्दर्शक सुट्टीवर जाणार होते. त्यावेळी त्यांनी मला मालिकेचा एक पूर्ण एपिसोड करण्यासाठी माझ्यावर विश्वास दाखवला. मीही त्यामुळे खूप आनंदी झालो आणि माझ्यापरीने मी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न यादरम्यान दिला आहे’