वाघोली – वाघोली येथे अपंग संघटनेच्या वतीने धर्मेद्र सातव यांच्या पुढाकाराने शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांची लाडूतुला करण्यात आली. सर्व लाडू दिव्यांग बांधव व गरिब लोकांना आमदार पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
याप्रसंगी वाघोली च्या सरपंच वसुंधरा उबाळे, माजी सरपंच शिवदास उबाळे, तात्यासाहेब काळे,प्रदिप कंद संदेश आव्हाळे, नंदू राऊत, अनिता कांबळे ,दिवेकर साहेब,बाळू काळभोर,बापू कोकरे,आकाश लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी तालुक्यामधील दिव्यांग बांधवाना सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळून देण्यासाठी तसेच संजय गांधी पेन्शन योजना, विभक्त रेशन कार्ड , बेघर दिव्यांगांना घरकुल मिळून देऊ व दिव्यांगांना आरोग्याविषयीच्या सुविधा मिळून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आमदार अशोक पवार यांची लाडू तुला करण्यासाठी धर्मेंद्र सातव,अब्दुल पठान, गणेश सातव, सुप्रिया लोखंडे,कैलास कुसाळकर,दत्ता बहिरट,मुक्तेश्वर खैरनार, शंकर सातव यांनी परिश्रम घेतले.
“सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी अविरतपणे कार्य करणारा एकमेव आमदार म्हणून अशोक पवार यांची ओळख आहे. अशोक पवार यांची लाडू तुला दिव्यांग बांधवांकडून होणे हा मोठा सन्मान आहे.”
– बाळासाहेब सातव पाटील
वरिष्ठ उपाध्यक्ष हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष