मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त देवेंद्र फडणवीस यांना राजकीय नेत्यांसह जनतेकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून खास शुभेच्छा दिल्या जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आक्रमक, धडाडीचे नेते आहे. गेल्या पाच वर्षात त्यांनी महाराष्ट्रात विकासाची नवी उंची गाठली. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गरीबांच्या विकासासाठीही चांगले काम केले आहे. त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो या आशयाचे ट्विट करत युजर्स शुभेच्छा देत आहे.
अशातच दुसरीकडे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी फडणवीस यांची तुलना थेट भगवान श्री रामासोबत केली आहे. वाढदिवसानिमित्त फडणवीस यांना शुभेच्छा देताना लाड यांनी ही तुलना केलीय.
प्रसाद लाड यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे या फोटोमध्ये फडणवीस यांच्या खांद्यावर भगवी शाल असून लाड हे त्यांना प्रभू श्रीराम आणि भगवान हनुमान यांच्या गळाभेटीची प्रतिमा भेट देताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत लाड यांनी फडणवीस हे आपल्याला प्रभू रामाप्रमाणे असून आपण हनुमान आहोत असं म्हटलंय.
आपण त्यांच्याशिवाय अपूर्ण असल्याचा उल्लेखही लाड यांनी पोस्टमध्ये केलाय. ‘प्रभू रामाला माझे विनम्र प्रणाम. जसे भगवान रामाशिवाय हनुमान अपूर्ण आहे, तसाच मीही… माझ्या प्रभू याशिवाय अपूर्ण आहे, मी माझ्या भगवान श्रीरामाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दिर्घायुष्य लाभो यासाठी प्रार्थना करतो,” जय श्री राम जय बजरंग बली. #देवेंद्रजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!’ असेही त्यांनी लिहिले आहे त्यांच्या ट्विटची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. तसेच वाढदिवसानिमित्त फडणवीस यांना शुभेच्छा देताना लाड यांनी ही तुलना केल्यामुळे विरोधी पक्षाकडून लाड यांच्यावर टीका केली जात आहे.