मुंबई – भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे’, असे अजब विधान केले आहे. भाजपच्या नेत्यांची शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव सुरूच असल्याचं यातून दिसून येत आहेत. सध्या प्रसाद लाड यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामध्ये त्यांनी हे व्यक्तव्य केल्याचं दिसून येत आहे. मात्र, प्रसाद लाड यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली असून, एका नवीन वादाला तोंड फुटल्याचा दिसून येत आहे.
👇🏻काय ते अगाध ज्ञान!
इतिहासाला कोड्यात टाकणारा हा इतिहास! वा गुरूजी, जन्म कोकणातील, स्वराज्याची शपथ रायगडावर, बालपण रायगडावर!😳अध्यक्ष महोदय,माझी विनंती आहे की अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे इतिहासाचे दाखले देण्यास एकतर मनाई करावी किंवा अशा व्यक्तींना इयत्ता + pic.twitter.com/A2DE3maDSW
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 4, 2022
सध्या प्रसाद लाड यांच्या या व्यक्तव्याचा राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून निषेध नोंदवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील प्रसाद लाड यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर त्यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. तसेच एक विडिओ देखील शेअर केला असून, यामध्ये त्यांनी हाताच्या कोपऱ्यापासून नमस्कार केला आहे.
शिवरायांवरील विधानाबाबत माझी प्रतिक्रिया…#कोपरापासून_नमस्कार🤦♂️#ChhatrapatiShivajiMaharaj pic.twitter.com/l65xjtF2pj
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 4, 2022
“काय ते अगाध ज्ञान…अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की, अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे इतिहासाचे दाखले देण्यास एकतर मनाई करावी किंवा अशा व्यक्तींना इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून किंवा कोणत्याही शिवभक्ताकडून विशेष प्रशिक्षण देण्यात यावे.. अन्यथा आम्हाला तरी सांगावे की हा इतिहास कुठे शिकावा, कुणी सांगावा?, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.