मुंबई – चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे अभिनेता कुशल बद्रिके घरा घरात पोहचला. सिनेमा असो टीव्ही कुशल आपल्या निखळ मनोरंजनासाठी ओळखला जातो. कुशल आपल्या प्रोजेक्टबाबत सोशल मीडियावरून चाहत्यांना अपडेट देत असतो. अशीच एक पोस्ट कुशलने केली होती. काही न्यूज वेबसाईटने मात्र या पोस्टचा विपर्यास केला आणि मग कुशल चांगलाच भडकला.
झालं असं कुशल बद्रिकेने आपल्या इंस्टावरून एक पोस्ट शेअर केली होती. यावेळी कुशल लंडनला चाललेला असल्यामुळे या पोस्टमध्ये त्याने फोटोही शेअर केले होते. एकट्याने प्रवास करण्याची व्यथा यावेळी त्याने आपल्या पोस्टमध्ये मांडली होती. मात्र काही मीडिया वेबसाईटने त्याची चुकीची बातमी करून पब्लिश केली आणि कुशलला हीच बाब खटकली. त्याने त्या बातमीचा स्क्रिनशॉट काढत एक पोस्ट केली. ज्यामध्ये कुशल म्हणतो,कमालीचे बातमीदार… हे असं मांडणारा माणूस रात्री सुखाने झोपू शकतो ? देव यांना सदबुद्धी देवो”.
काय म्हंटल होत कुशलने नेमकं त्या पोस्टमध्ये
“मी एकट्याने कधीच सिनेमा पाहीलेला नाही, interval, मधला समोसा आणि पॉपकॉर्न share करण्यात सिनेमा पेक्षा जास्त मज्जा आहे अस मला नेहमी वाटत, एकटाच असा hotel मद्धे जाऊन मी कधी जेवलेलो नाही, मला काय order करावं हेच सुचत नाही, तसंच एकट्याने प्रवास करायला सुद्धा मला आवडत नाही, कदाचित मला माझ्याच सोबत खुप बोर होत असावं,पण आज सिनेमाच्या शूटिंगसाठी एकट लंडनलाला जावं लागतय,इंटरनॅशनल प्रवासात, पृथ्वीचा व्यास ओलांडताना घड्याळाचा तासही बदलतो ही गोष्ट मला अजूनही जादुई वाटते.
View this post on Instagram
खिडकीतून दिसणारे ढग, ढगांच्या चाळणीतून दिसणारा समुद्र, त्यातुन डोकावणारा सुर्यप्रकाश अवेळी रात्र ह्या सगळ्यात कुणीतरी गप्पा मारणार हव यार…पण आयुष्याच्या प्रवासात शेवटा पर्यंत आपल्याला साथ करणारे फक्त आपणच असतो, काही लोक हाथ सोडवून घेतात तर काहींचे हाथ आपल्या हातून अलगद सुटतात, शेवटचा प्रवास मात्र एकट्यानेच करावा लागतो. मग एखादा विमान प्रवास एकट्याने करायला काय हरकत आहे, पण तरीही वाटतं….किमान इंटरनॅशनल ट्रेव्हलमधे आपल्या वाट्याचे 2-peg प्यायला तरी कुणी हव होत…. हॅप्पी जर्नी टू मी. अशी पोस्ट कुशलने केली होती.