उद्योजकता विकासासाठी कुल फाउंडेशनचा पुढाकार

दोन वर्षांत राज्यात 100 नवे उद्योजक घडविण्याचा निर्धार

पुणे – व्यवसायाच्या उत्तम कल्पना आणि उद्योजक बनण्याची प्रबळ इच्छा बाळगणाऱ्या तरुण-तरुणींसाठी पुण्यातील कुल फाउंडेशन फॉर सोशल इनिशिएटिव्हतर्फे उद्योजकता विकाससाठी पायलट प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. 17 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या देशासाठी उद्योजकता या प्रकल्पाच्या माध्यमातून 2 वर्षांत राज्यात 100 नवे उद्योजक घडविले जाणार आहेत, अशी माहिती कुल फाउंडेशनचे संस्थापक व प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक ललितकुमार जैन यांनी दिली.

संस्थेचे संयोजक अभय मठ, तसेच विवेक अत्रे, डॉ. वासुदेव बर्वे, नितीन घोले या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात सुरुवातीला पुणे, निगडी, कोल्हापूर आणि औरंगाबाद या चार केंद्रांवर प्रत्येकी 20 ते 25 तरुण-तरुणींची निवड करून त्यांना 3 महिन्यांचे विनामूल्य प्रशिक्षण मिळणार आहे. प्रशिक्षणानंतर 9 महिन्यांपर्यंत व्यवसाय उभारण्यासाठी सहकार्य केले जाणार आहे. पुढील 2 वर्षे व्यवसायाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या मदतीसाठी कुल फाउंडेशन सज्ज राहणार आहे, असे जैन यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)