प्रो कबड्डी स्पर्धा : हरयाणाकडून पुणे पराभूत

हैदराबाद – प्रो कबड्डी स्पर्धेतील दुसऱ्या लढतीत हरयाणा स्टीलर्सने पुणेरी पलटणचा 34-24 असा पराभव केला. अनुपकुमार या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली उतरलेल्या पुण्याच्या खेळाडूंनी पहिल्याच लढतीत अपेक्षाभंग केला. त्यांना हरयाणाविरूद्ध प्रभावी कामगिरी करता आली नाही. पूर्वार्धातच हरयाणा संघाने 22-10 अशी आघाडी मिळविली होती. त्यांनी सुरेख पकडी व खोलवर चढाया असा खेळ करीत पुण्याच्या मर्यादा स्पष्ट केल्या. उत्तरार्धात पुण्याच्या खेळाडूंनी चिवट लढत दिली मात्र, हरयाणाची आघाडी मोडून काढण्यात त्यांना अपयश आले.

पुण्याच्या पवनकुमार काडियन याने या स्पर्धेच्या इतिहासात 600 गुणांचा टप्पा ओलांडला. हीच त्यांच्यासाठी जमेची बाजू होती. त्याने 10 गुण घेत सुपरटेनची कामगिरी केली. पुण्याकडून मनजित (5 गुण) याचे प्रयत्न अपुरे ठरले. हरयाणा संघाच्या नवीनकुमार (14) याने संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. विकास काळे व परवीनकुमार यांनी प्रत्येकी 4 गुण घेत त्याला यथार्थ साथ दिली.

पुण्याचे प्रशिक्षक अनुप कुमार हे पूर्वी यू-मुंबा संघाकडून खेळत होते. प्रशिक्षक म्हणून प्रथमच त्यांच्याकडे यंदा जबाबदारी आली आहे. त्यामुळेच त्यांच्या कामगिरीविषयी उत्कंठा निर्माण झाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)