तेज, ईशान, मृणाल, मयूखी यांना विजेतेपद

चौथी पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरिज टेनिस स्पर्धा

पुणे – पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील चौथ्या पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज 2019 स्पर्धेत तेज ओक, ईशान देगमवार, मृणाल शेळके, मयूखी सेनगुप्ता या खेळाडूंनी आपापल्या गटांतील प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजेतेपद पटकावले.

मेट्रोसिटी स्पोर्टस अँड हेल्थ क्‍लब, कोथरूड येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम तेज ओक याने नीव कोठारीचा 4-2, 4-1 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. तेज ओक हा सिम्बायोसिस शाळेत सहावी इयत्तेत शिकत असून बाऊन्स टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. मुलींच्या गटात बिगरमानांकीत मृणाल शेळके हिने अव्वल मानांकित काव्या देशमुखचा 4-1, 5-2 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

14 वर्षाखालील मुलांच्या गटात दुसऱ्या मानांकित ईशान देगमवार याने पाचव्या मानांकित पार्थ देवरुखकरहा 4-1, 4-1 असा एकतर्फी पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. ईशान हा पीवायसी हिंदू जिमखाना येथे प्रशिक्षक हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. मुलींच्या गटात सातव्या मानांकित मयूखी सेनगुप्ता हिने सिमरन छेत्रीचा 4-0, 4-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीएमडीटीएचे सदस्य जयंत कढे आणि मेट्रोसिटी स्पोर्टस अँड हेल्थ क्‍लबचे नवनाथ शेटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुपरवायझर रेशम रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.

सविस्तर निकाल :

12 वर्षाखालील मुले: उपांत्य फेरी:
नीव कोठारी वि.वि. अर्जुन परदेशी 7-3, तेज ओक वि.वि. शार्दूल खवळे 7-2.
अंतिम फेरी : तेज ओक वि.वि.नीव कोठारी 4-2, 4-1.

12 वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी :
काव्या देशमुख(1) वि.वि. श्रावणी देशमुख 7-5, मृणाल शेळके वि.वि. दुर्गा बिराजदार(3)7-4.
अंतिम फेरी : मृणाल शेळके वि.वि. काव्या देशमुख(1)4-1, 5-2.

14 वर्षाखालील मुले – उपांत्य फेरी –
पार्थ देवरुखकर(5) वि.वि. अर्जुन अभ्यंकर(1)7-6(2), ईशान देगमवार (2) वि.वि. निनाद मुळ्ये7-1,
अंतिम फेरी : ईशान देगमवार (2) वि.वि. पार्थ देवरुखकर(5)4-1, 4-1.

14 वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी:
सिमरन छेत्री वि.वि. अलिना शेख 7-1, मयूखी सेनगुप्ता(7) वि.वि. संचिता नगरकर(2)7-3.
अंतिम फेरी : मयूखी सेनगुप्ता(7) वि.वि. सिमरन छेत्री 4-0, 4-0.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here