नगर – नगर-पुणे महामार्गावरील स्टेशन रस्त्यावरील युनियन बॅंक फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना हत्यारासह कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. यातील आणखी दोघांचा शोध पोलीस घेत आहे.
आरोपी उसवाल इंपीरीयल चव्हाण, सेन्थाल अस्तंनदुर काळे (दोघे. रा.कुरण वस्ती वाळुज, ता. नगर) यांना ताब्यात घेतले आहे. स्टेशन रस्त्यावरील फरत हॉटेलच्या बाजूला असलेली युनियन बॅंक अज्ञात चोरट्यांनी महाराष्ट्र दिनी प्रयत्न केला होता. याबाबत बॅंक व्यवस्थापक यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठांण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, उपविभागीय पोलीस अधीकारी संदीप मिटके, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ यांना मिळालेल्या माहितीवरून हा गुन्हा चव्हाण व त्याच्या साथिदाराने केला असल्याची खात्रिशिर माहिती मिळाली. व ते नगर तालुक्यातील वाळुज येथील कुरण वस्तीवर आहेत. त्यानुसार या पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. व त्यांची घरझडती घेतली असता त्यांचे कडे दोन पांढरे रंगाचे हन्डग्लोज, एक लोखंडी सत्तुर मिळून आला. ही कारवाई मनोज कचरे, गणेश धोत्रे, नितीन शिंदे, शाहीद शेख, सुजय हिवाळे यांनी केली.