Kon Banega Crorepati Junior – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (amitabh bachchan) गेली अनेक वर्षे “कौन बनेगा करोडपती’ (Kon Banega Crorepati) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. सध्या ‘कौन बनेगा करोडपती ज्युनियर’ (Kon Banega Crorepati Junior) चालू आहे. या कार्यक्रमाद्वारे त्यांनी अनेक सामान्य व्यक्तींचे नशीब बदलून टाकले आहे.
आता सुरू झालेल्या या कार्यक्रमातून ते प्रेक्षकांचे त्यांच्या स्टाईलने मनोरंजन करताना पहायला मिळत आहेत. या शोद्वारे कुणी लखपती तर कुणी करोडपती बनतात. मात्र, काही जणांच्या नशिबी निराशा येते.
सध्या सुरु असलेला ‘कौन बनेगा करोडपती ज्युनियर’ (Kon Banega Crorepati Junior) हा शो दिवसेंदिवस रंजक होत चालला आहे. या शोमध्ये एकापेक्षा एक हुशार स्पर्धक पाहायला मिळत आहेत.
बिग बी या स्पर्धकांबरोबर धमाल करताना दिसतात. अशातच एका अवघ्या 12 वर्षांच्या मुलाने 1 कोटी रुपये जिंकले आहेत. सध्या या मुलाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.
हरियाणातल्या महेंद्रगढ इतं राहणारा 12 वर्षांचा मयंक (Mayank) या आठवड्यात हॉट सीटवर होता. अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांची धडाधड उत्तर देत मंयकने 1 कोटी रुपयांपर्यंत मजल मारली.
एक कोटी जिंकणारा सर्वात लहान स्पर्धक बनत मयंक इतिहास रचला आहे. मयंकला सात कोटीसाठीच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. त्यामुळे एक कोटी रुपयांवर त्याने समाधान मानलं.
View this post on Instagram
काय होता 1 कोटी रुपयांसाठी विचरलेला प्रश्न
नव्याने सापडलेल्या खंडाला ‘अमेरिका’ हे नाव असलेला नकाशा तयार करण्याचे श्रेय कोणत्या युरोपियन कार्टोग्राफरला दिले जाते?
ए) अब्राहम आर्टिलियस, बी) जेरार्डस मर्केटर, सी) जिओव्हानी बॅटिस्टा अॅग्रेसी, डी) मार्टिन वाल्डसीमुलर हे पर्याय देण्यात आले होते.
या प्रश्नावर मयंक थोडा गोंधळलेला दिसतो. त्याला उत्तराची खात्री नसते आणि मग तो त्याची उरलेली लाईफलाईन वापरतो. यानंतर, मयंक एक कोटीच्या प्रश्नाचे उत्तर देताना ‘डी’ पर्याय निवडतो.
त्याने निवडलेले मार्टिन वाल्डसीमुलर हे उत्तर अगदी बरोबर असते आणि तो एक कोटी रुपये जिंकतो. बिग बी त्याला मिठी मारून एक कोटी रुपये जिंकल्याबद्दल शुभेच्छा देतात.