पुणे -जबलपूर विभागांतर्गत सुरू असणाऱ्या “इंटरलॉकिंग’च्या कामामुळे पुण्यामार्गे धावणारी कोल्हापूर ते धनबाद एक्स्प्रेस चार दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे. कोल्हापूर स्थानकातून सुटणारी एक्स्प्रेस दि. 1, 8, 15 आणि 22 ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आली आहे. तर दि. 5, 12, 19 आणि 26 ऑगस्ट रोजी धनबाद स्थानकातून सुटणारी एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहे.