#IPL2021 ( RCBvMI ) : कोहली बनला दस हजारी मनसबदार

दुबई – रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली याने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात दमदार अर्धशतकी खेळी करताना एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. टी-20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा कोहली पहिलाच भारतीय फलंदाज ठरला.

कोहलीने या सामन्यात जेव्हा 13 वी धाव काढली तेव्हाच त्याने या विक्रमाला गवसणी घातली. या सामन्यापूर्वी त्याच्या नावावर 313 टी-20 सामन्यांतून 9 हजार 987 धावा होत्या. टी-20 सामन्यांमध्ये त्याने 5 शतके फटकावली असून, त्याने 73 अर्धशतकेही साकार केली आहेत.

दरम्यान, कर्णधार विराट कोहली व ग्लेन मॅक्‍सवेल यांच्या दमदार अर्धशतकी खेळींच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने मुंबई इंडियन्समोर विजयासाठी 166 धावा करण्याचे आव्हान ठेवले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.