मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री अनेकदा सुंदर दिसण्यासाठी चांगला मेकअप करतात. स्टायलिश ड्रेस परिधान करून आपले फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल करतात. पण सुंदर दिसण्याच्या नादात अनेकदा अशा अडथळ्यांचा सामना करावा लागतो ज्यामुळे त्यांचं इतरांसमोर चांगलंच हस होतं. आता बॉलिवूड प्रमाणे हॉलिवूडमधील किम कार्दशियन या अभिनेत्रीला देखील अशाच एका प्रसंगाचा सामना करावा लागला आहे.
अभिनेत्री किमचा नुकताच एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामुळे ती चांगलीच ट्रोल झाली आहे. रियालिटी टीव्ही स्टार किम कार्दशियनचा हा व्हिडिओ मिलान फॅशन वीकचा एक भाग असलयाचे समोर आले आहे. यावेळी तिने सिल्व्हर कलरचा स्पार्कलिंग बॉडीकॉन गाऊन परिधान केला होता. ज्यात ती अप्रतिम दिसत होती परंतु तिला जिन्यावरून चालताना आणि गाडीत बसताना प्रचंड त्रास सहन करावा लागल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळते.
View this post on Instagram
किमने स्वतः तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ शेअर केला आहे. पण आता या व्हिडीओमुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागत आहे.चाहत्यांनी तर तिला कमेंटमध्ये नको ते सल्ले दिले आहेत. कोणी तिला चप्पल न घालण्याचा सल्ला दिलाय तर कोणी असिस्टंट ठेवण्याचा सल्ला दिला आहे.