मुंबई – अॅव्हेंजर्स एन्ड गेम या हॉलिवूडपटाने युवा वर्गासह सर्वांनाच भूरळ घातली आहे. दि.26 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे तिकीट प्रेक्षकावर अक्षरश: प्रेक्षक तुटून पडले आहेत. सुपरहिरोंसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘माव्र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ने भारतीयांच्या मनात एक वेगळेच घर निर्माण केले आहे. त्यामुळे भारतात पहिल्याच दिवशी सिनेमाने जोरदार कमाई करत ५३ करोड रुपये कमवले होते. तर आतापर्यंत या चित्रपटाने बाहुबली २ ला मागे टाकत २४४.३० कोटी रुपयांचा बिझनेस केला आहे.
#AvengersEndgame is on a record-smashing spree… Holiday on Wed [some states] proved advantageous… Now highest grossing #Hollywood film in #India… Fri 53.60 cr, Sat 52.20 cr, Sun 52.85 cr, Mon 31.05 cr, Tue 26.10 cr, Wed 28.50 cr. Total: ₹ 244.30 cr Nett BOC. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) May 2, 2019
भारतात हा सिनेमा इंग्रजी, हिंदी , तामिळ आणि तेलगू या चार भाषांमध्ये २६ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. देशातील बाहुबली या सिनेमाला अशाच प्रकारची ओपनींग मिळाली होती. तर आमिर खानच्या ठग्स सिनेमाने पहिल्याच दिवशी ५२ करोडची कमाई केली होती.
‘अॅव्हेंजर्स एन्ड गेम’ या सिनेमाने पहिल्याच दिवशी जगभरात १२०० कोटींची कमाई केली असून, या कमाईत केवळ चायनाचा वाटा सर्वाधिक आहे. एण्डगेमसाठी मोठं मार्केट ठरलेल्या चायनासोबतच साऊथ कोरियामध्ये ८.४ मिलियन डॉलर्स, ऑस्ट्रेलियामध्ये ७ मिलियन डॉलर्स, फ्रान्समध्ये ६ मिलियन डॉलर्स, इटलीत ५.८ मिलियन डॉलर्स, तर जर्मनीमध्ये ५.६ मिलियन डॉलर्स इतकी कमाई झाली आहे. ‘माव्र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’चा आतापर्यंतचा हा २२ वा सिनेमा आहे.