‘अ‍ॅव्हेंजर्स एन्ड गेम’ चित्रपटाची रेकॉर्डब्रेक कमाई, ३०० कोटींच्या पार

मुंबई – अ‍ॅव्हेंजर्स एन्ड गेम या हॉलिवूडपटाने युवा वर्गासह सर्वांनाच भूरळ घातली आहे. दि.26 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे तिकीट प्रेक्षकावर अक्षरश: प्रेक्षक तुटून पडले आहेत. सुपरहिरोंसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ने भारतीयांच्या मनात एक वेगळेच घर निर्माण केले आहे. त्यामुळे भारतात पहिल्याच दिवशी सिनेमाने जोरदार कमाई करत ५३ करोड रुपये कमवले होते. तर आतापर्यंत या चित्रपटाने बाहुबली २ ला मागे टाकत ३१२.९५ कोटी रुपयांचा बिझनेस केला आहे.

भारतात हा सिनेमा इंग्रजी, हिंदी , तामिळ आणि तेलगू या चार भाषांमध्ये २६ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. देशातील बाहुबली या सिनेमाला अशाच प्रकारची ओपनींग मिळाली होती. तर आमिर खानच्या ठग्स सिनेमाने पहिल्याच दिवशी ५२ करोडची कमाई केली होती. त्यामुळे अ‍ॅव्हेंजर्स एन्ड गेम हा सिनेमा लवकरच ४०० कोटी रुपयांपर्यंत मजल मारण्याची शक्यता फिल्मी जगतातून वर्तविली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.