राहुरी – वांबोरी परिसरातून अल्पवयीन असलेल्या दोन सख्या बहिणींचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची घटना घडली.
या घटनेतील एक महिला वांबोरी परिसरात राहत असून त्यांना दोन मुली आहेत. त्या शिक्षण घेत आहेत. दि. 13 जुलै रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दोन मुली व त्यांची आई घरात असताना मुली घराबाहेर बसल्या होत्या.
काही वेळाने त्यांची आई घराबाहेर आल्या असता दोन्ही मुली बेपत्ता झाल्या. आईने परिसरात शोध घेतला, त्यानंतर राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात इसमाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला