बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केले. कियाराच्या लुकचे सर्वांनी कौतुक केले आहे. कियाराने गुलाबी आणि काळ्या रंगाचा सॅटिन गाऊन परिधान केला होता. यासोबत तिने काळे हातमोजे आणि बल्गेरी नेकलेस घातला होता. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. कियाराने तिच्या लूकने सगळ्यांना प्रभावित केले पण तिच्या ॲक्सेंटमुळे तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले गेले. यानंतर कियाराने एक पोस्ट शेअर करत प्रतिउत्तर दिल आहे.
कियाराच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लोक कियाराच्या ॲक्सेंटला फेक म्हणत आहेत. त्यामुळे तिला खूप ट्रोल केले जात आहे. आता कियाराने ट्रोल्सचे नाव न घेता त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
कियारा अडवाणीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने महिलांबद्दलचा एक कोट शेअर केलाय. तिने लिहिले, ‘ती मुलगी व्हा जी दुसऱ्या मुलीला आधार देते, अनोळखी व्यक्तीला सांगते की तिचे केस अप्रतिम दिसत आहे, आणि इतर महिलांना स्वतःवर आणि त्यांच्या स्वप्नांवर विश्वास ठेवण्यास प्रोत्साहित करते. कियाराची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
कियाराने मनोरंजन उद्योगात गेल्या काही वर्षांत दिलेल्या योगदानाबद्दल सर्व महिलांचे कृतज्ञता व्यक्त केली. कियारा म्हणाली, ‘कान्सला माझी ही पहिलीच भेट आहे. रेड सी फिल्म फाऊंडेशनसोबत आल्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे, कारण आम्हाला सिनेमा आवडतो आणि आम्ही वर्षानुवर्षे महिलांना पाठिंबा देत आहोत.”
तिच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कियारा शेवटची सत्यप्रेम की कथा मध्ये कार्तिक आर्यनसोबत दिसली होती. आता ती लवकरच राम चरणसोबत गेम चेंजर आणि रणवीर सिंगसोबत डॉन 3 मध्ये दिसणार आहे.