श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मोठी मुलगी जान्हवी कपूरने बॉलीवूडमध्ये डेब्यु केले आहे. पण त्यांची छोटी मुलगी खुशीच्या पदार्पणाबाबत चाहत्यांना खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे. खुशीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. यात ती आपल्या चित्रपटांच्या प्लॅनिंगबाबत माहिती देताना दिसत आहे. यामुळे ती लवकरच पदार्पण करणार असल्याची चित्रपटसृष्टीत चर्चा आहे.
View this post on Instagram
No caption needed!!!!!! @khushi05k ❤❤ #khushibae #khushilo #khushikapoor
बोनी कपूरची छोटी मुलगी खुशीने न्यूयॉर्क फिल्म ऍकॅडमीत ऍडमिशन घेतले आहे. इंस्टाग्रामवर तिचा एक व्हिडिओ आला आहे, ज्यात ती आपण चित्रपटात पूर्ण तयारीसह येणार असल्याचे सांगत आहे.
या व्हिडिओत खुशी आपले इंट्रोडक्शन देत सांगते की, माझे कुटुंबीय या क्षेत्राशी संबंधीत आहे. पण ते कामयच दूर पाहिलेले आहे. तसेच काही वर्षांपूर्वी माझी बहीण जान्हवीने देखील न्यूयॉर्क फिल्म ऍकॅडमी जॉइन केली होती. यासंदर्भात मला तिच्याकडूनच माहिती मिळाली.
View this post on Instagram
Bombshell🔥 #lakmefashionweek #khushikapoorr #manishmalhotra #stunner #khushilo #khushibae
या व्हिडिओ खुशी म्हणते, मी माझ्या फॅमिलीसोबत काम करू इच्छिते, पण संपूर्ण तयारी करूनच. यात खुशीच्या क्लासरूमचे फुटेजदेखील आहेत. सध्या सोशल मीडियावर खूशीचा हा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. जान्हवीनंतर आता चाहते खुशीच्या अभिनयाची आतुरतेने वाट पाहत आहे.