केतकी चितळेला अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यास अटक

मुंबई – ‘तुझं माझं ब्रेकअप’ फेम अभिनेत्री केतकी चितळेला अश्लील भाषेत शेरेबाजी करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या आरोपीला गोरेगाव पोलिसांनी औरंगाबाद येथून अटक केली आहे. सतीश पाटील असं ट्रोल करणाऱ्याचं नाव आहे. हिंदी भाषेत बोलल्याने सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आल्याच्या मुद्यावरून केतकीने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. केतकीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनसुद्धा सादर केलं होतं. त्यानंतर याप्रकरणी कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

काही दिवसांपूर्वी, केतकीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर आपले फॅन्स मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेतील असल्यानं सर्वांना समजेल अशा हिंदी भाषेत व्हिडीओ करण्याची वाजवी भूमिका मांडली होती. मात्र केतकीने आपली मातृभाषा सोडून हिंदीतून व्हिडीओ काढण्याची घेतलेली भूमिका काहींना अजिबात रुचली नाही. केतकीच्या या भूमिकेचा सोशल मीडियावर विरोध देखील होऊ लागला. ट्रोलर्सने सवयीप्रमाणे ‘बिलो द बेल्ट’ किंवा कंबरेखालील कमेंट्‌स द्यायला सुरुवात केली खरी परंतु ट्रोलर्सच्या कमेंट्‌सना इतरांप्रमाणे इग्नोर न करता केतकीने यावर ठाम भूमिका घेतली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.