सैम बायोपिकमधील विकी कौशलचा फर्स्ट लूक रिलीज

बॉलीवूडमध्ये अभिनेता विकी कौशल याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. चित्रपटसृष्टीत आता त्याला हमखास यश मिळविणा-या अभिनेत्यांपैकी मानले जात आहे. यावर्षी प्रदर्शित झालेला त्याचा “उरी ः द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट सुपर हिट ठरला होता. आता तो परत एकदा आपल्या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाला आहे.


देशातील पहिले फिल्ड मार्शल सैम मानेकशॉ यांच्या बायोपिकमध्ये काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच समोर आलाय. या बायोपिकचं नाव सैम असं आहे.  सैम बायोपिकमधील विकी कौशलचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. यात तो हुबेहूब मानेकशॉ यांच्यासारखा दिसतो आहे. या बायोपिकचं दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहे. आधी या भूमिकेत अभिनेता रणवीर सिंग काम करणार असल्याची चर्चा होती. मात्र आता हे स्पष्ट झालंय की विकी कौशल रुपेरी पडद्यावर मानेकशॉ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २०२१मध्ये प्रदर्शित होणारेय आणि या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला करत आहेत.

 

View this post on Instagram

 

Not so vanilla… ?

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

Leave A Reply

Your email address will not be published.