शिरूर -शिरूर शहरातील विठ्ठलनगर परिसरातील भूमिअभिलेख कार्यालयामध्ये काम करणारी बत्तीस वर्षीय महिला बाधित आढळल्याची माहिती शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक तुषार पाटील यांनी दिली आहे. महिलेच्या संपर्कात आलेल्या 23 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यात शहरातील याच कार्यालयात काम करणाऱ्या 16 व बाहेरील 7 नागरिकांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी याच कार्यालयात काम करणारी एक महिला बाधित आढळली होती.
शिरूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात काम करणारी एक महिला काही दिवसांपूर्वी आढळलेली बाधित महिला रोज केडगाव ते शिरूर अशी प्रवास करून कामाला येत होती. यानंतर कार्यालयात दक्षता घेत असताना महिलेस त्रास होत असल्याने (दि.30) जूनला महिलेची खासगी लॅबमध्ये तपासणीकरिता स्वॅब पाठविले होते. (दि.3) विठ्ठल नगर परिसरातील महिला कामगार बाधित आढळली आहे. महिलेवर पुणे येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.