सनी लिओनचे चाहते सगळ्या जगभर पसरले आहेत. ती जरी सिनेमांमध्ये कमी दिसत असली तरी तिची चर्चा मात्र सारखी सुरू असते. दिल्लीतील एका रेस्टॉरंटमध्ये तिची चर्चा होण्याचे एक विशेष कारण घडले.
View this post on Instagram
या रेस्टॉरंटमधील मलाई चाप डिशचे नाव सनी लिओनच्या नावावरून ठेवले गेले आहे. या डिशची खूप चर्चा व्हायला लागली, तशी त्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि सनी लिओनपर्यंत पोहोचली.
View this post on Instagram
तिने या रेस्टॉरंटमधील या डिशचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. आपल्या नावाच्या डिशबद्दल ऐकल्यावर सनीला हसू आवरेना. या रेस्टॉरंटमध्ये सनी लिओनच नव्हे तर बेबी डॉल आणि मिया खलिफा यांच्या नावाने मलई चाप डिश विकली जाते आहे.
View this post on Instagram
यापूर्वी दिल्लीतीलच आणखी एका हॉटेलमध्ये सनी लिओनच्या नावाने कबाब देखील विकले जात असत. आता सनीच्या नावाने आणखी एक डिश सुरू झाल्याने सोशल मीडियावर सनीच्या नावे अनेक मिम्स सुरू झाली आहेत.
View this post on Instagram
या रेस्टॉरंटमध्ये मार्केटिंगचा फंडा जबरदस्त वापरला आहे, हे नक्की. त्यातून सनी लिओनची प्रसिद्धीही वाढते आहेच आणि रेस्टॉरंटचा धंदादेखील वाढतो आहे.
View this post on Instagram