पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी फुंकर काफीला नवकविंचा या शीर्षकाखाली कविकट्ट्याचे आयोजन केले होते, विद्यापीठातील शिवाजी गार्डनमधील हिरवळीवर हा कविकट्टा संपन्न झाला.
वेगवेगळ्या विभागातील विद्यार्थ्यांनी प्रेमासंबंधित तसेच देशातील सद्याच्या सामाजिक, राजकीय, परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या कविता यावेळी सादर केल्या,उपस्थित विद्यार्थ्यांनी अनेक कवितेला भरभरून प्रतिसाद दिला.
विद्यापीठातील नवकवींना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी या कविकट्ट्याचे आयोजन केले होते. यासाठी बाबर सय्यद, आकाश दौंडे यांनी परिश्रम घेतले.
– विष्णू नाझरकर,
कॉलेज रिपोर्टर,
राज्यशास्त्र विभाग,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ