सविंदणे- कवठे येमाई ता .शिरूर येथे तीन कोरोना बाधीत रूग्ण सापडल्यामुळे ग्रामीण भागात एकच खळबळ माजली होती. त्यामुळे कवठे येमाई हे गाव १४ दिवस प्रतिबंधित क्षेत्र (कन्टेनमेंट झोन ) घोषित करण्यात आल्याची माहीती उपविभागीय आधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी दिली आहे.
या प्रतिबंधित क्षेत्रात बँक ,ओपीडी , वैदयकिय दवाखाने यांचे सहीत संपूर्ण प्रकारच्या आस्थापना दि. १९ मे पासून १४ दिवस बंद राहील. प्रतिबंधित क्षेत्रात अत्यंत अत्यावश्यक सेवेसाठी वापरात येणाऱ्या वाहना व्यतिरिक्त इतर सर्व वाहनांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच कवठे येमाई परिसर केंद्रस्थानी धरून पाच किलोमीटर चा परिसर हे क्षेत्र बफर झोन म्हणून घोषित केले आहे.
कवठे येमाई परीसरात तीन ठिकाणी चेकपोस्ट तयार केले असून पोलिस, होमगार्ड, शिक्षक त्या ठिकाणी तैनात करण्यात आल्याची माहीती पोलिस उपनिरीक्षक भगवान पालवे यांनी दिली आहे. सध्या सविंदणे ,कवठे यमाई, टाकळीहाजी , कान्हूर मेसाई ,चांडोह ,फाकटे, जांबुत या गावांमध्ये मुंबई – पुण्यावरून अनेक नागरिक दाखल झाले आहेत. त्यामुळे या भागांमध्ये येणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी घराच्या बाहेर पडू नये जेणेकरून आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल असे वागू नये. बाहेरगावावरून येणार्या नागरिकांची शेजारच्यांनी त्वरित माहिती द्यावी असे आवाहन सविंदणे गावचे सरपंच संतोष मिंडे यांनी केले आहे.