मुंबई – नुकतंच अभिनेता विकी कौशलने त्याचा 35 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याच्या सर्वच चाहत्यांनी आणि मित्रांनी त्याला जन्म दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अशा परिस्थितीत त्याची पत्नी कतरिना कैफ कशी मागे राहील. पती विकीच्या वाढदिवसानिमित्त कतरिनाने त्याला स्पेशल रोमँटिक पद्धतीने वाढदिवसाच्या अनोख्या दिल्या आहेत.
कतरिना कैफने विकी कौशलला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. कतरिनाने इन्स्टाग्रामवर विकीसोबतचे स्वतःचे दोन फोटो पोस्ट केले आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शेअर केलेला पहिला फोटो ब्लॅक अँड व्हाईट आहे. यामध्ये कतरिना आणि विकी डान्स करताना दिसत आहेत. त्याचवेळी, दुसऱ्या फोटोमध्ये विकी कॅटला हग करताना दिसत आहे. यावेळी दोघेही खूप खुश असल्याचे दिसते.
कतरिना कैफने या फोटोंसोबत विकी कौशलसाठी खास कॅप्शन लिहिलं आहे. तिने लिहिले, “थोडा डान्स, खूप प्रेम… माझ्या प्रिय व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा ” केवळ चाहतेच नाही तर स्टार्सही या फोटोंना खूप पसंत करत आहेत. यावर कमेंट करताना सोनम कपूरनेही विकीला शुभेच्छा दिल्या आहेत. तर एका चाहत्याने कॅटने मेन्शन केलेल्या डान्सबाबत कमेंट करत डान्सच्या व्हिडिओची मागणी केली आहे.
विकी कौशलच्या आगामी प्रोजेक्टबाबत बोलायचे झाले तर तो शेवटचा ‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपटात दिसला होता. त्याचबरोबर तो लवकरच ‘जरा हटके जरा बचके’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात विकी अभिनेत्री सारा अली खानसोबत पडद्यावर दिसणार आहे. हा चित्रपट २ जूनला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.