मुंबई – अनेक दिवसांपासून अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा आहे. दोघांना अनेकवेळा पार्ट्यांमध्ये एकत्र पाहण्यात आले होते. तेव्हापासून दोघेही त्यांच्या नात्याच्या अफवांमुळे चर्चेत आहेत. पुन्हा एकदा आदित्य आणि अनन्या डिनर डेटवर एकत्र स्पॉट झाले होते.
आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांना आतापर्यंत अनेकदा सार्वजनिकरित्या एकत्र पाहण्यात आले आहे. दरम्यान, हे जोडपे पुन्हा एकदा चर्चेत आले. आदित्य रॉय कपूर आणि अनाया पांडे यांचा एक व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही वांद्रे येथील एका रेस्टॉरंटमधून रात्रीचे जेवण करून बाहेर पडताना दिसले.
अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर पापाराझींसमोर एकत्र पोज देत नसल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. अनन्या पांडे पहिल्यांदा रेस्टॉरंटमधून बाहेर आली आणि पापाराझींना पोज दिली. यादरम्यान अभिनेत्री घाईत दिसली. यानंतर आदित्य रॉय कपूरने पॅप्ससाठी पोज दिली आणि तो कारमधून निघून गेला.
सोशल मीडियावर दोघांच्या डिनर डेटचा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी लग्नाची अटकळ बांधली. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, “खूप सुंदर दिसत आहे”. आणखी एका यूजरने लिहिले की, “हे बॉलिवूडचे पुढचे मोठे लग्न ठरणार आहे”. तर एकाने लिहिले, ‘तुम्ही लग्न कधी करणार? दोघेही एकत्र खूप क्यूट दिसत आहेत.