बॉलिवुडमधील युवा अभिनेता कार्तिक आर्यनचे एकापाठोपाठ एक चित्रपट येत आहे. आता कार्तिक आर्यन “दोस्ताना-2′ या कॉमिडी चित्रपटाच्या शूटिंगसाठी चंदिगढला रवाना झाला आहे. चंदिगढला जाण्यापूर्वी कार्तिकने करण जोहरच्या घरी जावून त्याचे आर्शिवाद घेतले.
कार्तिक आर्यनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत कार्तिक आर्यन हा करण जोहरचे आर्शिवाद घेत असल्याचे दिसून येते. या फोटोसह त्याने लिहिले आहे की, आईचा लाडका चंदिगढला रवाना झाला आहे. धर्मा चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी सर्व अभिनेत्यांच्या प्रथेचे मी अवलंबन करत आहे.
करण जोहर आणि कार्तिक आर्यनाचा हा फोटो अनन्या पांडेने क्लिक केला आहे. याशिवाय दोघांनी एक सेल्फीही घेतला. त्यानंतर करण जोहरने शेअर करत “दोस्ताना-2’ची अधिकृत घोषणा केली.
दरम्यान, कार्तिक आर्यन आता जान्हवी कपूरला ज्वॉइन करणार आहे, जी पूर्वीच अमृतसरला पोहोचलेली आहे. याशिवाय त्यांच्यासोबत को-स्टार लक्ष्याही हजर आहे. “दोस्ताना-2′ चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. कार्तिक-जान्हवी कपूरचा रोमांस पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये आतापासूनच उत्सुकता निर्माण झालेली आहे.