ऍक्शन स्टार अक्षय कुमार सध्या आपल्या आगामी “सूर्यवंशी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रोहित शेट्टीच्या या चित्रपटाच्या शूटिंगवेळी अक्षय कुमार जखमी झाला आहे. यात त्याच्या डाव्या हात मुरगळला गेला आहे. मात्र, त्यानंतरही अक्षय कुमारने फिजियोथेरेपिस्टच्या मार्गदर्शनाखाली शूटिंग पूर्ण केले, अशी माहिती सेटवरील उपस्थितांनी दिली.
“सूर्यवंशी’च्या सेटवर अक्षय कुमारला झालेल्या या दुर्घटनेबाबत अद्याप पुष्टि देण्यात आलेली नाही. मात्र, अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याच्या हाताला जखम झालेली दिसते. या चित्रपटाचे शूटिंग बॅंकॉक, मुंबई आणि हैदराबाद येथे करण्यात आले. ऍक्शनने भरुन असलेल्या या चित्रपटाच्या क्लायमेक्समध्ये अजय देवगण आणि रणवीर सिंहही झळकणार आहे.
दरम्यान, रोहित शेट्टीच्या या चित्रपटाशी संबंधीत अनेक अपडेट सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. “सूर्यवंशी’मध्ये अक्षय कुमार आणि कतरिना कैफ मुख्य भूमिका साकारत आहेत. या चित्रपटातील अक्षय कुमारचा हॅलिकॉप्टरमधील स्टंटचा सीन खूपच व्हायरल झाला होता.