मुंबई – निखिल सिद्धार्थ स्टारर ‘कार्तिकेय 2’ चित्रपट जगभरात कमाईचे झेंडे गाडत आहे. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या कार्तिकेय 2 ने वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा गल्ला कमावला आहे. या तेलुगू चित्रपटाने बॉलीवूडच्या बड्या सुपरस्टार्सनाही अक्षरशः धूळ चारली आहे. आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ आणि अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’ या यादीत अव्वल आहे.
Will Speak today at the KURNOOL event… evening 5 Pm onwards.. Kurnool Exhibition Grounds… Entire team will be there thanking the India Wide Audience for the Massive Success #Karthikeya2 #Karthikeya2Hindi pic.twitter.com/iXfs4uqj1N
— Nikhil Siddhartha (@actor_Nikhil) August 26, 2022
निखिल आणि ‘कार्तिकेय 2’ ची संपूर्ण टीम 100 कोटींचं यश सेलिब्रेट करण्यासाठी कर्नूल एक्झिबिशन ग्राउंडवर हजेरी लावली होती. निखिलने स्वतः ट्विटरवरून याबाबत सर्वांना निमंत्रण दिल होत. कार्तिकेय 2 हिंदीमध्ये देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. तरण आदर्शने एक ट्विट करत चित्रपटाच्या कमेबाबतची माहिती दिली आहे.
#Karthikeya2 jumps in Week 2… Strong word of mouth is converting into footfalls… Lack of major competition also helped… [Week 2] Fri 2.46 cr, Sat 3.04 cr, Sun 4.07 cr, Mon 98 lacs, Tue 1.15 cr, Wed 95 lacs, Thu 89 lacs. Total: ₹ 19.29 cr. #India biz. HINDI version. pic.twitter.com/O68t8I3mAT
— taran adarsh (@taran_adarsh) August 26, 2022
25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या विजय देवरकोंडाच्या लायगरला सोशल मीडियावर कमी प्रतिसाद मिळाला, तरीही कार्तिकेय 2 ने प्रेक्षकांमध्ये आपले स्थान कायम ठेवल्याचे दिसून आले. निखिल सिद्धार्थच्या विरोधात आमिर खान आणि अक्षय कुमार सारख्या बड्या स्टार्सचे चित्रपट होते, असे असूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे आणि दिवसेंदिवस चित्रपटाच्या कमाईत वाढ होताना दिसते. तर दुसरीकडे हिंदी चित्रपटाला अजूनही मोठ्या स्क्रिनवर कमाईच्या अपेक्षेसाठी वेटिंगवर थांबावे लागले आहे.