मुंबई – अभिनेता सनी देओलचा 2001 साली प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या सिनेमाला मोठे यश मिळाले. या चित्रपटात सनीसह अभिनेत्री अमीषा पटेल मुख्य भूमिकेत होती.
या चित्रपटातील सर्व कलाकरांच्या अभिनयाने आणि कथानकाने सर्वांच्या मनात घर निर्माण केले. गदरच्या यशानंतर तब्बल 22 वर्षांनी ‘गदर’ या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
सध्या या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने करोडो रुपयांची कमाई केली आहे. सिनेमाने आता पर्यंत अनेक मोठमोठ्या सिनेमांचा रेकॉर्ड मोडले आहेत.
‘गदर 2’ ला रिलिज होऊन आता आठ दिवस झाले असले तरी या सिनेमाची क्रेझ काही केल्या कमी होतांना दिसत नाही आहे. आणि त्यामुळेच आता चित्रपट कमाईच्या बाबतीत 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
आणि लवकरच 500 कोटींचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा निर्माते व्यक्त करत आहेत. सध्या सगळीकडेच या सिनेमाची हवा पाहायला मिळत आहे.