बंगळुरू – टेम्पो-ट्रकच्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत. हा अपघात तुमकुर येथील कळंबेल्लाजवळ झाला. अपघातात मृत्यू पावलेले रायचूर जिल्ह्यातील विविध भागांतील रोजंदारी मजूर होते. ते टेम्पोतून बंगळुरूला जात असताना हा अपघात घडला. अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
टेम्पोमध्ये सुमारे 24 प्रवासी होते. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जिल्ह्याचे उपायुक्त आणि पोलिस अधीक्षकांशी बोलून जखमींना आवश्यक उपचार देण्याचे निर्देश राज्याचे गृहमंत्री आणि तुमकुरू जिल्ह्याचे प्रभारी अराग ज्ञानेंद्र यांनी दिले आहेत.