karishma tanna – अभिनेत्री करिश्मा तन्ना (karishma tanna) टेलिव्हिजनवरील एक स्टायलिश अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर करिश्मा चांगलीच सक्रिय असते. ती सोशलवर नेहमीच आपले वेगळ्या अंदाजात फोटो शेअर करत असते.
नुकतंच प्रदर्शित झालेल्या ‘स्कूप’ (karishma tanna scoop) या क्राईम ड्रामा वेब सीरिज मध्ये करिश्मा मुख्य भूमिकेत झळकली होती. स्कूप ही वेबसिरीज खऱ्या आयुष्यावर आधारित आहे.
एका छोट्या शहरातील पत्रकार जीव धोक्यात घालून क्राईम रिपोर्टिंग करत असल्याचे वेब सिरीजमध्ये दाखवण्यात आले आहे. यात न्यूजरूम आणि क्राईम रिपोर्टर्सचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.
ही वेबसीरिज चांगलीच गाजली व प्रेक्षकांनी करिश्माचं तोंडभरून कौतुकही केलं. नुकतंच तिला या सीरिजसाठी (scoop) उत्कृष्ट अभिनेत्रीचा ‘ओटीटी प्ले’ पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्कार सोहळ्याला करिश्माने हजेरी लावली.
यासाठी तिने केलेला एक खास वेस्टर्न लुक तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. एका ग्रे रंगाच्या वेस्टर्न बोल्ड गाऊनमधील काही मोजके फोटोज करिश्माने तिच्या अकाऊंटवर शेअर केले.
यामध्ये अभिनेत्री कमालीची बोल्ड अँड ग्लॅमर्स दिसत होती. तिच्या चाहत्यांनी या फोटोवर कॉमेंट करत तिच्या हॉटनेसचं आणि फिटनेसचं कौतुक केलं आहे. अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत.