मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री आपल्या फिटनेसची नेहमीच काळजी घेत असतात. स्लिम फिट राहण्यासाठी रोज जिम आणि डायट मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक अभिनेत्री करताना दिसते. असाच एक प्रयत्न करीना कपूर खान देखील करत होती. बॉलिवूडमध्ये झिरो फिगर ट्रेंड सुरु करणारी करीना आपल्या फिटनेसची खूपच काळजी घेते. करीनाचा योगा करतानाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ज्यात जेह मध्येच येऊन तिला डिस्टब करताना दिसतो.
तैमूर आणि जेह अशी दोन मुले झाल्यानंतर करीना आपल्या बहिणीप्रमाणे केवळ कुटुंबाकडे लक्ष देईल असं चाहत्यांना वाटत होत. परंतु करीना स्वतःला फिट ठेवण्यासाठी रोज मेहनत करताना दिसते. करीना नेहमीप्रमाणे योगा करत असताना जेहमध्ये येऊन तिला डिस्टब करत असल्याचे दिसून येते. माय लेकाचा हा व्हिडीओ चाहत्यांना चांगलाच आवडत आहे.
View this post on Instagram
यावेळी करिना योगा आऊटफिट्समध्ये असल्याचे पाहायला मिळते. तर जेह देखील रेग्युलर कपड्यांमध्ये दिसत आहे. योगा करता करता जेह मध्येचं आल्याने करीना त्यावर चिडत नाही तर आपलं काम करता करता त्यासोबत खेळताना दिसते. या दोघांच्या व्हिडिओवर चाहत्यांनी जोरदार कमेंट केल्या आहेत. एका युजरने बेस्ट मॉम अँड सन अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने आई आणि मुलाचे सुंदर बॉंडिंग असलयाचे म्हंटले आहे.