बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर-खान ही सध्या प्रेग्नंट असून ती पुन्हा आई होण्याच्या अगोदर नवीन घरात शिफ्ट होण्याची तयारी करत आहे. करिना कपूर आणि सैफ अली खान यांच्या बांद्रा येथील शानदार घराची झलक त्यांनी आपल्या बर्थडे पार्टीज आणि ख्रिसमस डिनरच्या माध्यमातून चाहत्यांना दाखविली आहे.
बेबोने केलेल्या काही पोस्टवरून असा अंदाज काढण्यात येत आहे की, ती लवकरच नवीन घरात शिफ्ट होणार आहे. सैफ आणि बेबो हे सध्या फॉर्चून हाइट्स येथे राहत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी करिनाने आपल्या बेस्ट फ्रेंड्ससोबत आपल्या घरी पार्टी केली. ज्याचे फोटो तिने शेअर केले होते. हे फोटो शेअर करत करिनाने लिहिलेल्या कॅप्शनवरून ती नवीन घरात राहण्यास जाणार असल्याचे तिने सूचित केल्याचे दिसते.
करीनाने लिहिले होते की, It’s been a FORTUNE of memories… on to the next… to new beginnings. PS: #Fortune you have been kind #FortuneNights #EndOfAnEra’ आणि या कॅप्शनवरून असे स्पष्ट होते की, नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी करीनाने आपल्या जुन्या घरात फेयरवेल पार्टी ठेवली होती. दरम्यान, करिना आणि सैफ यांनी ऑगस्ट-2020 मध्ये दुसऱ्यांदा गुड न्यूज शेअर केली होती. यानुसार फेब्रुवारी महिन्यात करीना कपूर दुसऱ्यांदा आई होणार आहे.