ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटानंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला प्रभासचा आगामी ‘सालार’ चित्रपट भेटीला येतोय. या चित्रपटाबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. आता या चित्रपटाशी संबंधित एक नवीन अपडेट समोर आले आहे. ‘KGF’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा प्रशांत नील पहिल्यांदाच प्रभाससोबत काम करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांची क्रेझ पुढच्या स्तरावर आहे.
प्रशांत नील दिग्दर्शित ‘सलार’चा टीझर लवकरच रिलीज होऊ शकतो. प्रशांत त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपटासाठी खूप मेहनत घेत असून तो ‘सालार’चा टीझर पूर्ण तयारीने आणि भव्यतेने रिलीज करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशांत ज्या पद्धतीने तयारी करत आहे, त्यावरून टीझर धमाकेदार होईल, असे मानले जात आहे.
प्रभासचा चित्रपट ‘सालार’ चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यास फारसा वेळ नाही. हा चित्रपट 28 सप्टेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. होम्बल फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित, ‘सालार’ भारतातील सर्वात ज्येष्ठ दिग्दर्शक प्रशांत नील दिग्दर्शित करत आहेत, ज्यांनी ‘KGF 1’ आणि ‘KGF 2’ सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. अशात समीक्षक आणि प्रेक्षकांच्या या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ‘सालार’मध्ये प्रभासची मुख्य भूमिका आहे. त्याच्या सोबत श्रुती हासन दिसणार आहे. याशिवाय जगपती बाबूही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.