कराड – केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा कराड व उंब्रज येथिल शिवसैनिकांनी जाहीर निषेध केला. यावेळी त्यांच्या फोटोस जोडेमारो आंदोलन करुन तातडीने त्यांना अटक करण्याची मागणी तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली. यावेळी मुर्दाबाद, मुर्दाबाद, नारायण राणे मुर्दाबाद, नारायण राणेंचा धिक्कार असो, शिवसेना जिंदाबाद… अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या.
तर उंब्रज येथिल शिवसैनिकांकडून राणेंनी केलेल्या वक्तव्याचा निषेध पोलिसांना निवेदन दिले. केंद्रीय मंत्री राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह्य वक्तव्य केल्याचा आरोप करुन शिवसेनेच्या वतीने आज कराड येथील तहसील कार्यालयासमोर व बस स्थानक परिसरात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास निदर्शने करण्यात आली.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, जिल्हा उपप्रमुख रामभाऊ रैनाक, संजय मोहिते, तालुका प्रमुख नितीन काशीद, रामभाऊ खंडागळे, शशिकांत हापसे, तात्यासाहेब घाडगे, अक्षय गवळी, साजीद मुजावर, राजेंद्र माने, मधुकर शेलार, अतुल वैद्य नितीन देसाई, सुनिल शिंदे, सुभाष पाटील, शरद कुंभार, संदीप पवार, दत्ता पवार, अविराज देशमुख, प्रविण पाटील, सुनिल पाटील, महेश पवार, बाळासाहेब वसगडेकर, आशुतोष मोहिते, कृष्णा जगदाळे, सोमनाथ कुंभार, सुरेश बडेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देण्यात आले.
माजी जिल्हाप्रमुख संजय मोहिते म्हणाले, नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. रानेंची जनसंवाद यात्रा सातारा जिल्ह्यात आल्यास त्याला आम्ही कडवा विरोध करू. यावेळी बोलताना शिवसेना कराड शहरप्रमुख शशिराज करपे म्हणाले, मातोश्रीच्या तुकड्या वर मोठे झालेले राणे आजकाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करीत आहेत.
तर मुख्यमंत्री यांच्याविषयी अपमान जनक वक्तव्ये करणाऱ्या केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी उंब्रज येथे शिवसेना कराड उत्तर तालुका प्रमुख सुनिल पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या विषयी अपमान जनक वक्तव्य वापरून महाराष्ट्राचा अपमान केला आहे .त्यांच्या या वक्तव्यावरून समाजात तेढ निर्माण करून दंगली घडविण्याचा प्रयत्न दिसतोय. त्यामुळे वारंवार होणाऱ्या बेताल वक्तव्यावर अंकुश ठेवण्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदरची निवेदन उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांना देताना शिवसेना तालुका प्रमुख सुनिल पाटील, शिवसेना तालुका संघटक शिवाजीराव डूबल, उपतालुका प्रमुख संजय भोसले, उपविभाग प्रमुख संदीप संकपाळ, शिवडे शाखा प्रमुख महादेव भोंगळे हे उपस्थित होते.